Bharat Bandh : मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ! जबरदस्ती आस्थापने बंद करायला लावल्यास पोलिस कारवाई होणार

Bharat Bandh : मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ! जबरदस्ती आस्थापने बंद करायला लावल्यास पोलिस कारवाई होणार
Updated on

मुंबई  : भारत बंदच्या अनुषंगाने मुंबईत आज चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष करून या बंदला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने पाठींबा दर्शवल्यामुळे मुंबईतही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस प्रत्येक नाक्यावर पोलिस पथक तैनात करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या कायद्याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. याबाबत सर्वच विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात एकवटले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनीही या बंदला पाठींबा दिल्यामुळे राज्यातही त्याचा परिणाम जाणवणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल यांनाही सज्ज राहणार आहे. 

मुंबईत बाहेरून येणा-या मार्गावर काल (सोमवार) पासूनच वाहनांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या मदतीनेही प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदच्या पार्श्वभूमिवर निश्चित स्थळांवर बंदोबस्त तसेच गस्ती घालण्यात येणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त कुमकही पुरवण्यात आली आहे. कोणीही जबरदस्तीने आस्थापने बंद करू नये. तसे करणा-यांवर पोलिस कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते उपायुक्त एस चैतन्य यांनी दिली. 

mumbai all set to face bharat band check police deployment in the city

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com