बँक कर्मचारी असल्याचं भासवत खात्यातील 5 लाख 84 हजार केलेत गायब, मग मुंबई पोलिसांनी रचला सापळा

बँक कर्मचारी असल्याचं भासवत खात्यातील 5 लाख 84 हजार केलेत गायब, मग मुंबई पोलिसांनी रचला सापळा
Updated on

मुंबई : बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून खातेदाराला ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्याला झारखंडमध्ये गजाआड करण्यात आले आहे. सदर कारवाई मुंबई पोलिस दलाच्या वडाळा टी. टी. पोलिसांनी केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल, स्वत:च्या वापरासाठी बाळगलेला MI कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम 40 हजार रुपये आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीने अशा प्रकारे आणखी नागरिकांना फूस लावल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वडाळा परिसरात राहणाऱ्या इसमाच्या मोबाईलवर फोन आला. बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून भामट्याने इसमाशी संवाद साधला. संवादादरम्यान त्याने बँक खात्याची माहिती इसमाकडून घेतली. त्या माहितीच्या आधारे बँक खात्यातील 5 लाख 84 हजार रुपये PayTm द्वारे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. फसवणूक झाल्याचे समजताच इसमाने वडाळा टी.टी. पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ 4 चे उपायुक्त विजय पाटील यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वडाळा टी. टी. पोलिस ठाण्याचे पथक गुन्ह्याचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान पोलिस  पथकाला आरोपीची माहिती मिळाली. हाती लागलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीने नियोजबद्धरीत्या लुटमारीचा कट रचला होता. गुन्ह्यात वापरलेला मोबाईलच्या आयएमइआय क्रमांकाची माहिती तपासली असता त्यात पश्चिम बंगाल येथील पत्त्यांचे सिम कार्ड वापरण्यात आले होते. तसेच ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले ते बँक खाते गुजरात राज्यातील असल्याचे समजले. त्यामुळे आरोपीच्या अटकेत अडचणी येत होत्या. मात्र वडाळा टी. टी. पोलिसांच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याचा अखेर छडा लावला.

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी झारखंडमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारे वडाळा टी. टी.पोलिस ठाण्याचे तपासी पथक झारखंड येथे दाखल झाले. तब्बल 8 दिवस आरोपीच्या अटकेसाठी सापळा लावल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने झारखंडमधील जिल्हा डुमका येथील जोंका, पोस्ट- कर्मा, थाना-टालझारी येथून आरोपी गंगाधर दुखन मंडल (वय 21) याला ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर पूर्तता करून वडाळा टी. टी. पोलिसांनी आरोपी गंगाधन मंडल याला अटक करून मुंबईत आणले.

सदर गुन्ह्याची उकल अपर पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, परिमंडळ 4 चे उपायुक्त विजय पाटील, सायन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भरत भोईटे, वरिष्ठपोलिस निरीक्षक शैलेश पासलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय बिराजदार, पोलिस नाईक गायकवाड, पोलिस शिपाई  पवार, पोलिस शिपाई  जावीर आदी पथकाने केली.

mumbai police cyber police cyber crime banking fraud major breakthrough 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com