भयंकर! आपले रक्षकच होताहेत कोरोनाचे भक्षक! एकट्या मुंबईत 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 22 मे 2020

  • एकट्या मुंबईत 900 पोलिसांना कोरोनाची लागण
  • 24तासांत 150 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा 900 झाला असून  गेल्या 24 तासांत मुंबईत सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एक हजार 666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा गुरुवरी 750 होता. शुक्रवारी  त्याता आणखी 150 पोलिसांची भर पडली असून हा आकडा 900 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अंधेरीतील ओशिवरा पोलिस ठाण्यातील 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यात चार अधिका-यांच समावेश आहे.

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 14 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यात183 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 483 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण 3 हजार 717  रिलिफ कँप आहेत. तर जवळपास3 लाख, 54 हजार 195  नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असून त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार आहे. सुदैवाने राज्यात 473 पोलिस कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यात 35 अधिका-यांचा समावेश आहे.

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

मुंबईत आतापर्यत 191 कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात एका उपायुक्त दर्ज्याच्या अधिका-याचाही समावेश आहे. मुंबईतील वाकोला येथे पोलिसांसाठी विशेष कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखान्यात ही कोविड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai alone, 900 policemen were infected with corona 150 corona infections in 24 hours