कहर ! एकट्या मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार, मृतांचा वाढता आकडा चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 285 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 6751 जणांना घरी पाठवण्यात आले आहे.

मुंबई, ता. 21 : मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच असून, नव्या 1382 रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा 25,317 वर पोहोचला. मृतांच्या संख्या 41 ने वाढल्यामुळे कोव्हिडबळींचा आकडा 882 वर गेला. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी 142 जण गेल्या आठवडाभरातील आहेत.

हे ही वाचा : एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

मुंबईतील वेगवेगळ्या भागांत कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग झालेले 1382 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 25,317 झाली. त्यापैकी 1240 रुग्णांची गुरुवारी नोंद झाली, तर 142 रुग्ण आठवडाभरापूर्वी दाखल झाले आहेत. दगावलेल्या 41 रुग्णांपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांंमध्ये 24 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी तिघे 40 वर्षांखालील, 21 जण 60 वर्षांवरील आणि 17 जण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा 841 झाला आहे.

नक्की वाचा : अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

आतापर्यंत 6751 रुग्ण कोरोनामुक्त
गुरुवारी 777 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 22,484 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 285 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 6751 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयांतील 5524 रुग्ण आणि खासगी रुग्णालयांतील 1227 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयांत दाखल झालेल्या 28 टक्के रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, त्यांच्यापैकी 46 टक्के महिला आणि 54 टक्के पुरुष आहेत.

In Mumbai alone, the total number of corona positive is 25,000, with the death toll 882


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai alone, the total number of corona positive is 25,000, with the death toll 882