
आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. कँटिन चालवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलीय. आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यानं कँटिनमधील जेवणाच्या दर्जाची चर्चा रंगली होती.