

Woman constable bursts firecrackers in police station right after senior inspector's transfer
Sakal
मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक आणि पोलीस दलात चर्चेचा विषय ठरलेला प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची बदली होताच, एका महिला पोलीस शिपायाने थेट पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, संपूर्ण मुंबई पोलीस दलात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.