मुंबईत अंधेरी पश्चिमेला कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, जाणून घ्या स्थिती

mumbai-covid.jpg
mumbai-covid.jpg

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नाही. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे इशारे सरकारकडून दिले जात आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये फरक इतकाच आहे की, रुग्णसंख्या जास्त दिसत असली, तरी मृत्यूदर कमी आहे. ८० ते ८५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह असले, तरी त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीयत. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आलेत, पण रुग्णसंख्या कमी होण्यामध्ये त्याचा परिणाम दिसून आलेला नाही. 

अंधेरी पश्चिमेला कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी अंधेरी पश्चिमेच्या वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी पश्चिमेला दररोज २०० ते ३०० दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळतायत. त्यामुळे महापालिकेने या भागात चाचण्यांची संख्या वाढवली आहे. अंधेरीतील ही रुग्ण संख्या कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे उपाय सुचवलेत, त्यात जुहू बीच बंद करण्याचा एक पर्याय आहे. कारण जुहू बीचा अंधेरी पश्चिमेच्या वॉर्डमध्ये येतो. 

मोठ्या संख्येने पर्यटक या समुद्र किनाऱ्यावर फिरायला येत असतात. २२ मार्चला अंधेरी पश्चिम वॉर्डमध्ये ३०० कोरोना रुग्ण आढळले. यातले बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधले होते. या वॉर्डचे आठवड्याचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ०.९७ टक्के आहे. "जुहू बीचवर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही क्लीनअप मार्शल तैनात केले आहेत. बीचजवळ असलेल्या भेल प्लाझामध्ये सोमवारपासून आम्ही अँटिजेन चाचण्या सुरु केल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवला तर त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचीही मागणी केली आहे" असे सहाय्यक महापालिका आयुक्त विश्वास मोती म्हणाले. नागरिकांच्या परवानगीशिवाय या अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com