अनिल देशमुखांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | Anil deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

अनिल देशमुखांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती.

"अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहे. त्या़ंचे वय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी" असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.

हेही वाचा: कंगनाच्या जागी कोणी मुस्लिम असतं तर त्याला देशद्रोही ठरवलं असतं- ओवैसी

देशमुखांवर कारागृहात खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व्हावेत तसेच औषध पुरवण्याबाबत ही अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाने अनिल देशमुखांना वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे. मात्र घरचे जेवण देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही.

loading image
go to top