esakal | मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानंतर त्यापाठोपाठ पावसाळी आजार ही मोठ्या संख्येने वाढत आहे. मुंबईत सध्या पाऊस सुरु असल्याने एकीकडे थंड वातावरण आहे मात्र, हे वातावरण डेंग्यू, मलेरियाच्या डासांसाठी सोयीचे असते. यामुळे, मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 21 रुग्ण सापडले होते. पण, यावर्षी ही संख्या चार पटीने वाढून 85 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ मलेरिया रुग्णही वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या 12 दिवसांत मुंबईत 200 हून अधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे अधिक रूग्ण सापडले पालिकेने आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद केलेली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे 750 रुग्ण सापडले होते. तर, या वर्षी 210 रुग्ण नोंदले गेले आहेत. आतापर्यंत 9 महिन्यांत 3, 606 रुग्ण सापडले आहेत.

मुंबईत मलेरियापाठोपाठ लेप्टोचेही रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये 57  रुग्ण आढळले होते आता ही संख्या 18 वर आहे. तर, डेंग्यूचे 85 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या आता वाढली असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

चार वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण

12 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 85 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण हे सॅन्डहर्ट रोड, वरळी, प्रभादेवी, दादर व माहीम येथे आढळल्याने डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. तर 12 सप्टेंबरपर्यंत मलेरिया - 210, लेप्टोचे 18, गॅस्ट्रोचे 92, कावीळचे 14 तर स्वाईन फ्ल्यूचे 6 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश येत असतानाच आता पावसाळी आजारांचे संकट थोपवणे पालिकेच्या आरोग्य विभागा समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जुलैपासून डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळी आजारांमध्ये वाढ  होत आहे.  1 जानेवारी ते 12 सप्टेंबरपर्यंत साथीच्या आजारांच्या आकडेवारीनुसार मुंबईत साथीच्या आजारांचे संकट गडद होत आहे. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या आळ्यांचा शोध घेण्यासाठी 4 लाख 46 हजार 77 घरांची तपासणी केली असता 4,108 ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

हेही वाचा: अलीगढशी जुनं नातं; मोदींनी सांगितली वडिलांच्या मुस्लिम मित्राची आठवण

1 जानेवारी ते 12 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी

मलेरिया - 3,606

लेप्टोस्पायरोसिस- 151

डेंग्यू - 305

गॅस्ट्रो - 1,964

हेपेटायटीस- 179

एच1 एन 1 - 52

loading image
go to top