मुंबई : आरोग्य व शिक्षण यावर जनजागृती ; अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : आरोग्य व शिक्षण यावर जनजागृती ; अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन"

मुंबई : "अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन" ही संस्था गेली पाच वर्षे अर्नाळा गावात स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यावर काम करीत आहे ,ही संस्था गावात युवा वर्गासाठी विविध उपक्रम राबत असते . या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २०१६ रोजी झाली असून गेली पाच वर्षे ही संस्था प्लास्टिक च्या विरोधात काम करीत आहे. ही संस्था दर रविवारी किनारे स्वच्छता अभियान राबवत असते तसेच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे याबाबत जनजागृती करत असते.

वृक्षारोपण,मुलांना शालेय शिक्षण च्या वस्तू चे वाटप शिक्षणना साठी इतर काही मदत हवी असेल ती करणे ,गरजुनां धान्य वाटप.असे विविध उपक्रम आपल्या संस्थे कडून राबविले जातात.

समुद्रकिनारा हा शहरातील नागरिकांसाठी पर्यटन व विरंगुळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपान दारूच्या बाटल्या येथेच फोडतात वा टाकून जातात. त्यामुळे काचेचे तुकडे सर्वत्र पडलेले आढळतात. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांच्या या संस्थेतर्फे सात ते आठ महिन्यांपासून नियमित शनिवार, रविवारी हा किनारा साफ करण्यात येत आहे.

mumbai

mumbai

हेही वाचा: सोशल मिडियावर संस्थेची बदनामी! 25 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा

mumbai

mumbai

या संस्थेची सदस्य किंवा काम करण्याची इच्छा असल्यास भेटण्याचे व स्वच्छता करण्याचे ठिकाण : अर्नाळा समुद्र किनारा तारीख : प्रत्येक रविवार वेळ : सकाळी ८.३० ते १० अधिक माहिती साठी संपर्क : प्रदीप सालियन : +919145458149

loading image
go to top