esakal | सोशल मिडियावर संस्थेची बदनामी! 25 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मिडियावर संस्थेची बदनामी! 25 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा

सोशल मिडियावर संस्थेची बदनामी! 25 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : गौडगाव ( ता . बार्शी ) येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, उपोषण करुन संस्था व पदाधिकारी यांचेविषयी बदनामीकारक भाषण करुन सोशल मिडियावर प्रसारण केल्याप्रकरणी संशयित भास्कर जगन्नाथ काकडे यास न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एन .एस .सबनीस यांनी दिले आहेत.

तालुक्यातील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव ही संस्था 1943 मध्ये जनार्धन लोहकरे गुरुजी यांनी स्थापन केली असून संस्थेचा गौरव कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिले आयटीआय, इंग्रजी शाळा, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, पाणी पुरवठा योजना, भुकंपरोधक गृहप्रकल्प, टेलरिंग, पोल्ट्री, डेअरी, महिला शिक्षण, सोलर, फॅब्रिकेशन आदि उपक्रम संस्थेच्यावतीने राबविले जातात. संस्थेचे अध्यक्ष विनायक गरड, उपाध्यक्ष विश्वनाथ कानडे, खजिनदार मदनलाल खटोड, असून विश्वस्त बळवंत पाटील, अनिल गरड, अरुण भड, जीवन लोहकरे, इंद्रसेन भड, पंडीत लोहकरे कार्यरत आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

माहिती अधिकाराचा दुरुपयोग करुन संस्थेची बदनामी करण्याच्या हेतूने या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे अशा मजकुराचा अर्ज 2 जुलै 2020 रोजी भास्कर काकडे यांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांना दिला. 15 जुलै 2020 रोजी काकडे याने उपोषण केले, उपोषणस्थळी जमाव बोलावून संस्था व पदाधिकारी यांची बदनामी करणारे भाषण केले, हे भाषण व्हाट्सअॅप, फेसबुक या सोशल मिडियावर प्रसारित केले.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नाहक बदनामी केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष विनायक गरड यांनी बार्शी येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. खटला प्रक्रिया सुरु करुन संशयित आरोपी काकडे यास न्यायालयात हजर राहण्याचे आदेश 9 ऑगस्ट रोजी पारित केले आहेत . संस्थेच्या झालेल्या बदनामीमुळे अब्रुनुकसान भरपाईसाठी 25 लाख रुपयांचा विशेष दिवाणी दावा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बार्शी येथे दाखल केला असून न्यायालयाने काकडे यांस नोटीस समन्स जारी केले आहे. संस्थेच्या वतीने अॅड. प्रशांत शेटे काम पहात आहेत .

loading image
go to top