esakal | 'हयात रिजन्सी'च्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांची कोर्टात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel-Hyatt-Regency

'हयात रिजन्सी'च्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांची कोर्टात धाव

sakal_logo
By
विराज भागवत
  • या प्रकरणावर २८ जूनला कोर्ट घेणार सुनावणी

मुंबई: दोन महिन्यानंतर मुंबईसह (Mumbai) राज्य अनलॉक (Unlock) झाले. दीर्घ कालावधीनंतर सुरु होत असलेल्या हॉटेल (Hotels), रेस्टॉरंट्समुळे (Restaurants) व्यवसायिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाजवळच्या हयात रिजन्सी (Hyatt Regency) या पंचताराकीत हॉटेलचे (5 Star Hotels) दरवाजे ग्राहकांसाठी बंद करण्यात आले. सोमवारी हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे पगार (Unable to pay employee salaries) देण्यासाठी कंपनीकडे पैसै नाही, त्यामुळे नाईलाजाने हॉटेल सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी (Employees Union) एका संघटनेच्यामार्फत थेट वांद्रे येथील इंडस्ट्रीयल कोर्टात (Industrial Court) धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी २८ जूनला होणार आहे. (Mumbai As 5 star Hotel Hyatt Regency shuts operations employees move industrial court)

हेही वाचा: मुंबई, उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

सोमवारचा दिवस मुंबईतील प्रसिध्द हयात रिजन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अंत्यत वाईट दिवस ठरला. हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक हरदिप मारवा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल लिहून, हॉटेल सुरु ठेवण्यासाठी पैसै नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवणार असल्याचा निर्णय कळवला. मुंबईतल्या हयात रिजन्सीची मालकी एशियन हॉटेल (पश्चिम) या कंपनीकडे आहे. इंडिया हयातचे उपाध्यक्ष सुजय शर्मा यांनी सांगितले, सध्या कंपनी अडचणीत असून सेवा सुरु ठेवणे कठीण असल्यामुळे पुढच्या सुचनेपर्यंत हॉटेल बंद असणार आहे. याच निर्णायविरोधात कर्मचाऱ्यांनी कोर्टाकडे दाद मागितली आहे.

हेही वाचा: मुंबईत तब्बल अडीच महिन्यांनंतर घडली 'ही' चांगली गोष्ट

सध्या हयात मध्ये थांबलेल्या पाहुण्यांची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल व्यवस्थापनासोबत बोलणे सुरु आहे. त्यामुळे हयात हॉटेल्सची मध्यवर्ती बुकिंग सेवादेखील काही काळासाठी स्थगित ठेवली जाणार आहे. दिल्लीच्या जे डब्लू मॅरीयेट्स या प्रसिध्द हॉटेलची मालकीदेखील एशियन हॉटेल्सच्या उपकंपनीकडे आहे. फेब्रुवारी महिन्यातच या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाने राजीनामा दिला होता.

हेही वाचा: Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

मुंबई हयात रिजन्सीची मालक असलेली एशियन हॉटेल्स (वेस्ट) ही कंपनी डबघाईला आली आहे. 2019-20 च्या वार्षिक अहवालात कंपनीला 218.46 कोटींचा तोटा झाल्याचे सांगण्यात आले. या वर्षात कंपनीचे उत्पन्न 143 कोटी होते, तर 2018-19 मध्ये कंपनीचे उत्पन्न 159 कोटी होते. दोन वर्षात कंपनीचा फायदा 16 कोटींवरुन अडीच कोटींवर आला आहे.


loading image
go to top