फडणवीस अन् महाराष्ट्रातील सत्तास्थापना; एकनाथ खडसे म्हणतात...

"एखादा पक्ष आता जर सरकार बनवायला पुढे आला, तर देवेंद्रजी..."
Eknath-Khadse-Devendra-Fadnavis
Eknath-Khadse-Devendra-FadnavisE-Sakal
  • "एखादा पक्ष आता जर सरकार बनवायला पुढे आला, तर देवेंद्रजी..."

मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांची सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी कसलाही विचार न करता केवळ 'मी सत्तेत आले पाहिजे' (Government Formation) या विचाराने अजित पवार (Ajit Pawar) सत्ता स्थापन केली होती. आजही त्यांच्या मनात तीच तळमळ दिसते. अशा परिस्थितीत, अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही पक्ष पुढे आला तरीही ते सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. (NCP Leader Eknath Khadse making fun of Devendra Fadnavis criticize BJP)

Eknath-Khadse-Devendra-Fadnavis
स्पा, सलूनमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई- किशोरी पेडणेकर

"राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत की हे सरकार पडणार. देवेंद्र फडणवीस तर सरकार पडण्याचा मुहूर्तही सांगतात. पण सरकार मात्र पडत नाहीये. त्याउलट सरकार अधिकाधिक मजबूत होतंय", असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath-Khadse-Devendra-Fadnavis
आठवडाभरात ४ हजाराहून अधिक रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे ऑडिट पूर्ण

"सरकार पडणार अशा सारख्या वावड्या उठवल्या जात आहेत. त्यामागचं खरं कारण म्हणजे भाजपच्या आमदारांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. निवडणुक जिंकून आणि आपल्या पक्षाच्या जास्त जागा येऊनही आपण सत्तेत नाही ही गोष्ट त्यांच्या मनात कायम आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पक्षातील नाराज आमदारांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे आपलं सरकार येणार असं सारखं सांगून या आमदारांसमोर वेळ काढला आहे", असा टोलाही खडसे यांनी लगावला.

Eknath-Khadse-Devendra-Fadnavis
"ट्विटरच्या ब्लू टीकपेक्षा लसीकरणाच्या टीक्याकडे लक्ष द्या"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com