
Asiatic Town Hall
ESakal
मुंबई : एशियाटिक सोसायटी व्यवस्थापन समितीसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सदस्य होण्यासाठी आलेल्या अर्जांच्या महापूरामुळे एशियाटिकने सर्वाचे लक्ष्य वेधले आहे. दुसरीकडे एशियाटिकच्या रुबाबदार टाऊन हॉल इमारतीची दुरवस्था झाली आहे. छत गळतीमुळे काही ठिकाणी पीओपी भाग कोसळला आहे. एशियाटिकच्या ऑयकॉनिक पायऱ्यांमध्ये काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीला अजून सुरूवात झाल्याची बाबसमोर आली आहे.