अस्मिता योजना दोन हजार गावांपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक म्हणून मागच्या एकाच आठवड्यात दोन हजार 372 बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचतगट कार्यरत असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 11 हजार 439 मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी 518 जणांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली आहे. यातून सुमारे 20 लाख 86 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. किशोरवयीन मुलींना फक्त 5 रुपयांत, तर महिलांना स्वस्त दरांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे तसेच त्याच्या वितरण व्यवसायातून बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दुहेरी उद्देशाने नुकताच जागतिक महिलादिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
Web Title: mumbai asmita scheme village sanitary napkin