
मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. वांद्रे पश्चिममधील लिंकिंग रोडवर असलेल्या क्रोमा शोरुममध्ये आज पहाटे भीषण आग लागली. इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाल्याने ही आग आणखी भडकली,