मजूर संस्थेत अनेक पदाधिकारी मविआचे; मात्र कारवाई फक्त माझ्यावरच? दरेकरांचा सवाल

Pravin Darekar
Pravin Darekar sakal media

मुंबई : मुंबै बँकेच्या प्रकरणावर प्रवीण दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबै बँकेच्या कारवाईवरुन दरेकर आक्रमक झाले आहेत. यावेळी दरेकर यांनी राज्यातील मजूर संस्थेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील पदाधिकारी यांची यादी वाचून दाखविली आहे. (Pravin Darekar)

Pravin Darekar
"आमचा तीव्र द्वेष करावा यासाठी 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला"

यावेळी विधानपरिषदेत आक्रमक होऊन बोलताना दरेकर म्हणाले की, मी वीस-पंचवीस वर्षे या सहकार चळवळीत काम करतोय. बेरोजगार तरुणांसाठीही काम केलंय. राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आहे. मात्र, फक्त प्रवीण दरेकरांवरच कारवाई होईल, असं सांगून टाका. यांनी सहकार चळवळीवर दरोडे टाकायचे. 22,300 रुपये भत्ता घेतल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आलाय, असा आरोपही त्यांनी केला आहे. राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आहे. बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, असं सुरु आहे.देशातला सुनियोजित घोटाळा कोणता असेल तर तो महाराष्ट्र सहकारी शिखर बँकेचा घोटाळा होय, असंही ते म्हणाले. (Pravin Darekar)

Pravin Darekar
"आमचा तीव्र द्वेष करावा यासाठी 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला"

पुढे ते म्हणाले की, सहकार मंत्री सूड भावनेने वापर करत आहे. सहकार मंत्र्यांनी आणि सीएमओ मधून कॉल करून कारवाई करायला लावली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिरडून टाकायचा प्रयत्न केला जात आहे.१५ हजार मजूर संस्था आहेत, तुम्ही किती लोकांवर कारवाई करणार? असा सवालही त्यांनी केला आहे. (Pravin Darekar)

मी सहकार मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे, सहकार उध्वस्त व्हावी अशी माझी भावना नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून गिरीश महाजन यांच्या प्रमाणे माझ्याबाबत षडयंत्र रचले जात असल्याचं मी सांगणार आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. ते मी त्यांना दाखविणार आहे. सहकार चळवळीवर दरोडे यांनी टाकायचे आणि माझ्यावर आरोप करायचे की मी २५ हजार भत्ता घेतला. पुढे दरेकर यांनी राज्यातील मजूर संस्थेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील पदाधिकारी यांची यादी वाचून दाखविली आहे. (Pravin Darekar)

काय आहे हे प्रकरण?

मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलं होतं. विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधलं होतं. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसंच त्याचं उपजिविकेचं मुख्य साधन हे मजुरीच असेल. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं होतं. (Pravin Darekar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com