
Mumbai: कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्टने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
दरम्यान, मागील तीन वर्षांमध्ये बेस्ट बसच्या विविध अपघातांत ६२ जणांचा मृत्यू झाला, तर १७४ जण जखमी झाले. त्यातही भाडेतत्त्वावरील बसमुळे ६५ टक्के मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.