
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दी बेस्ट दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. सर्वांचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला असून यात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. मुंबई महापालिका निवडणुकांआधीच ठाकरे बंधुंना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली.