मुंबईकरांची शान! आता डबलडेकर बसही लवकरच सेवेत येणार... वाचा बातमी सविस्तर

संजय घारपुरे
सोमवार, 13 जुलै 2020

मुंबईची शान असलेली बेस्टची डबल डेकर अखेर रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय झाला आहे. सुरक्षित अंतराचे पालन करताना जास्त प्रवासी प्रवास करु शकतील याकडे मुंबईकर लक्ष वेधत होते. त्यामुळे अखेर डबल डेकरचा प्रवास पुन्हा सुरु होणार आहे.

 

मुंबई ः मुंबईची शान असलेली बेस्टची डबल डेकर अखेर रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय झाला आहे. सुरक्षित अंतराचे पालन करताना जास्त प्रवासी प्रवास करु शकतील याकडे मुंबईकर लक्ष वेधत होते. त्यामुळे अखेर डबल डेकरचा प्रवास पुन्हा सुरु होणार आहे.

वाचा - मालिकांचे शूटिंग सुरू झाले परंतु, तांत्रिक कामगार, ज्युनियर आर्टिस्टचे प्रश्व प्रलंबित...

नियमीत बसची क्षमता 51 प्रवासांची असते, तर डबल डेकरची 90. आता सुरक्षित अंतराचे नियम पाळण्याचे ठरवले तरी डबल डेकरमधून जास्त प्रवासी प्रवास करु शकतील अशी मागणी केली होती. आता अखेर आपल्या ताफ्यात असलेल्या 120 डबल डेकरपैकी 66 बस रस्त्यावर उतरवण्याचे ठरवले आहे. 
बेस्टने पारंपारीक बससह मिनी बसच्या फेऱ्या सुरु केल्या. या बस लहान रस्त्यावरुन जाऊ शकतात, पण सुरक्षित अंतराचे पालन करण्यासाठी बेस्टच चांगली अशी मागणी केली जात होती. वाहतूक अभ्यासकही सध्याच्या परिस्थितीत डबल डेकर जास्त उपयुक्त ठरतील, असे सांगत होते. त्याचवेळी त्यांनी बेस्टमध्ये पुढील बाजूस अतिरीक्त दरवाजा केल्यास सुरक्षित अंतर चांगल्या प्रकारे राखता येईल असेही सूचवले आहे.

वाचा - कठोर नियम, निर्जंतुकिकरणाचा खर्च, इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे कॅब चालकांवर उपासमारीची वेळ...

आता डबल डेकर सुरु करताना त्यातील प्रवासी क्षमता 90 वरुन 45 करण्यात आली आहे. नियमीत एकेरी डेकरमध्ये बसलेल्या 25 प्रवाशांसह पाच उभे प्रवासी मान्य करण्यात आले आहेत. बेस्टचे प्रवासी काही आठवड्यात 10 वरुन 15 लाखांपर्यंत वाढतील, असा कयास असल्यामुळे बेस्टने यापूर्वीच फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या स्थानकाजवळून फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. नव्या सुरु होणाऱ्या डबल डेकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरीमन पॉईंट आणि कफ परेड, कुलाबा ते वरळी, अंधेरी ते सीप्झ या मार्गावर असतील.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai best rolls out the big guns to fit passengers60 double deckers