esakal | IPL वर मुंबईत सट्टा, मालाडच्या हॉटेलमधून दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

IPL वर मुंबईत सट्टा, मालाडच्या हॉटेलमधून दोघांना अटक

सध्या दुबईमध्ये आयपीएल सुरु आहे. या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात आहे. अशातच सट्टा घेणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पदार्फाश केला आहे. 

IPL वर मुंबईत सट्टा, मालाडच्या हॉटेलमधून दोघांना अटक

sakal_logo
By
निसार अली

मुंबईः  सध्या दुबईमध्ये आयपीएल सुरु आहे. या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात आहे. अशातच सट्टा घेणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पदार्फाश केला आहे. 

गुन्हे प्रकटीकरण शाखा 10 च्या अधिकाऱ्यांना मालाडच्या हॉटेल मधून ऑनलाइन आयपीएलवर सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाली. ही गुप्त माहिती मिळताच सापळा रचून दोघांना अटक केली आहे. 

मालाड पश्चिमेतील लिंक रोड वर असलेल्या संपूर्ण हॉटेलच्या एक खोलीत काही इसम आयपीएल वरऑनलाईन  सट्टा चालवत असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली होती. छाप्यादरम्यान दोन तरुण दुबईत सुरू असलेल्या सामन्यांवर सर्वसामान्य लोकांकडून सट्टा घेत असल्याचे दिसून आले. त्यावर गुन्हे शाखा 10 च्या पथकाने 24 ऑक्टोबरला रात्री सुमारे 8.30 वाजताच्या दरम्यान छापा मारून दोन आरोपींनी अटक केली.

अधिक वाचा-  नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे सिडको भवनासमोर आंदोलन; पोलिसांनी महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

एक 42 वर्षीय आरोपी गोरेगांव तर दुसरा 36 वर्षीय आरोपी मालाड पूर्वेतील दफ्तरी रोड येथे राहतो. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना  28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  क्रिकेट सामन्यांवर बेटिंगसाठी या सट्टेबाजांनी एक वेबसाइट सुरू केली होती. या वेबसाइटवर पैसे भरून लॉगिन करता येते.

अधिक वाचा-  खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण; मुंबईतील रुग्णालयात दाखल

आरोपींकडून रोख रक्कम 12 हजार 240 आणि 1 बनावट सिम कार्ड जप्त करण्यात आले. ही कारवाई सहपोलिस आयुक्त मिलिंद बराम्बे,अपर पोलिस आयुक्त गुन्हे एस वीरेश प्रभु, उपपायुक्त परिमंडल 1 गुन्हे शाखा अकबर पठान यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा 10 विनय घोरपड़े यांच्या नेतृत्त्वात आणि सहकारी सह पोलिस निरीक्षक हणमंत डोपेवाड, वाहिद पठान धनराज चौधरी आणि इतर अधिकारी आणि सहकारी कर्मचारी  सहभागी होते.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai betting on IPL two arrested from Malad hotel