
तालुक्यातील माणकोली येथील एका गोदामात अवैध वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, तसेच त्यांच्यावर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आतापर्यंत भिवंडीतील घुसखोर बांगलादेशींचा हा आकडा ३० वर जाऊन पोहोचला आहे.