मोठी बातमी : 'बर्ड फ्लू'च्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल, राज्यातील बाधित जिल्ह्यांची पाहणी सुरू

मिलिंद तांबे
Saturday, 23 January 2021

पोल्ट्री फार्मपासून 1 किमी परिसरातील सर्व कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

मुंबई, ता. 23 : राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात दाखल झाले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे. 

चेन्नईचे क्वारंटाईन ऑफिसर डॉ. तपन कुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ही टीम दाखल झाली आहे. त्यांनी राज्यातील बर्ड फ्लू बाधित क्षेत्राची पाहणी देखील सुरू केली आहे. या पथकाने  पथकाने राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच पथकाने राज्यामध्ये पेण (रायगड), नांदे (पुणे), बेरीबेल (दौड, पुणे) या ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान तेथे केलेल्या रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

महत्त्वाची बातमी :  2 किलो 700 ग्रामचं गोल्डन घबाड हवाईमार्गे आलं मुंबईत आणि तरन्नुम खान, विशाल ओबेरॉय गेले थेट जेलमध्ये

केंद्राच्या पथकाने सर्वाधिक बाधित बीड व परभणी पेथील नियंत्रित क्षेत्रास भेटी देवून तेथील रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीची पाहणी केली आहे.

  • राज्यात आतापर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पालघर 69, रायगड 25, पुणे 6 सोलापूर 35 नाशिक 17, जळगाव 144, अहमदनगर 6 बीड 52, परभणी 1 जालना 34, नांदेड 60, उस्मानाबाद 10, अमरावती 39, यवतमाळ 390, व नागपूर 44 अशी कुक्कुट पक्षांमध्ये 932 एवढी मरतुक झालेली आहे.
  • बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई 2, ठाणे 22, पालघर 3, रत्नागिरी 5, पुणे 1, धुळे 2, अहमदनगर 3, बीड 1 व लातुर 3 अशी एकूण 42 पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 
  • कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई 6 , ठाणे 35, रत्नागिरी 11, सातारा 1, नाशिक 5 अहमदनगर 3, बीड 3, लातुर 1 व यवतमाळ येथे 1 अशा प्रकारे एकूण राज्यात 66 मृत आढळून आली आहे.
  • राज्यात आतापर्यंत एकूण 1040 पक्षांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. जानेवारी 8 पासून आजतागायत एकूण 13,792 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्त्वाची बातमी मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा इतकी विषारी ?

आतापर्यंत आलेल्या तपासणीच्या निष्कर्षापैकी कुक्कुट पक्षामधील काही नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये ठाणे, यवतमाळ, गोदिया, अहमदनगर आणि हिंगोली, अशा प्रकारे पाच जिल्हातील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्लू साठी पॉझिटिव्ह आले आहेत. तर वर्ध्यातील एका बदकाचा नमुना बर्ड फ्लू च्या HSNB स्ट्रेनसाठी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

बर्ड फ्लूसाठी सोळा जिल्ह्यातील कुक्कुट पक्षी नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी परिसरातील सर्व कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यातील तीस ठिकाणांपैकी 22 ठिकाणी कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्ठा नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 38658 पक्षी, 35146 अंडी 52684 किलो खाद्य नष्ट करण्यात आली आहेत, असं पशु संवर्धन विभागातील प्रधान सचिव  अनुप कुमार यांनी सांगितलं. 

mumbai birdflu news Central team arrives for bird flu inspection in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai bird flu news Central team arrives for bird flu inspection in maharashtra