मुंबई भाजपची निवडणूक समिती जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकाची तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्यवाटप, प्रचारसभा, तसेच उमेदवार निवड आणि जाहीरनामा प्रकाशनासह निवडणुकीतील सर्व कामांच्या दृष्टीने ही समिती महत्त्वाची मानली जाते. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, त्यात 29 सदस्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये संघटनमंत्री सुनील कर्जतकर यांच्यासह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, विद्या ठाकूर यांच्यासह खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, तसेच आमदार अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा, भाई गिरकर, राज पुरोहित, योगेश सागर, मुंबई भाजप महामंत्री सुनील राणे, अमरजीत मिश्रा, सुमंत घैसास, महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी, महापालिका गटनेते मनोज कोटक या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसह प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शायना एन. सी., संजय उपाध्याय, संजय पांडे, तर प्रवक्‍ते म्हणून आमदार राम कदम, अतुल शाह, मधू चव्हाण यांचा समावेश आहे, तर प्रतापभाई आशर आणि कांताताई नलावडे या ज्येष्ठ सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. 
 
Web Title: mumbai bjp election committee declared