
संजय ठाकूर यांचे पत्र; मुंबई भाजपने हात झटकले
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आयोध्या दौऱ्यावरून इशारा देणारे भाजपचे मुंबई प्रवक्ते संजय ठाकूर यांच्या पत्रावरून मुंबई भाजपने हात झटकले आहेत. या पत्राशी मुंबई भाजप सहमत नाही, असे पक्षाचे सचिव ॲड. विवेकानंद गुप्ता यांनी म्हटले आहे.
भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यानंतर संजय ठाकूर यांनीही एक पत्र लिहून राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागण्याचा इशारा दिला होता. अन्यथा आपण राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करू असेही त्यांनी म्हटले होते. मात्र संध्याकाळी मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी समाजमाध्यमांवर निवेदन प्रसिद्ध करून ठाकूर यांच्या पत्राशी मुंबई भाजपचा संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.
संजय ठाकूर यांनी वैयक्तिक पातळीवर ते पत्र लिहिले आहे. त्याचा मुंबई भाजपशी संबंध नाही. मुंबई भाजप पक्ष ठाकूर यांच्या मताशी सहमत नाही. प्रभू रामचंद्रांचे दर्शन जगातील कोणीही व्यक्ती घेऊ शकते. आणि राज ठाकरे तर नक्कीच दर्शन घेऊ शकतात, असेही गुप्ता यांनी या निवेदनात म्हटले आहे.
Web Title: Mumbai Bjp Leader Sanjay Thakur Mns Chief Raj Thackeray Ayodhya Visit Vivekanand Gupta
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..