BMC Budget: शिक्षण समितीकडे अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

BMC Budget: शिक्षण समितीकडे अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई:  मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ) शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. 

काय आहे यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात जाणून घ्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन २०२१-२२ चे अर्थसंकल्प शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे महापालिका सह आयुक्त रमेश पवार यांनी सादर केला. 

यंदा २९४५.७८ कोटींची तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी २९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी त्यात १.१९ कोटींची वाढ करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या शिक्षण बजेटमध्ये नाविन्याचा अभाव दिसतोय. केवळ नव्या सीबीएसई शाळांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. विशेष नवे प्रकल्प आणि योजनांऐवजी महापालिका शाळांचं नवं नामकरण आणि लोगो बदलण्यावरच भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. नाव आणि लोगो बदलल्यानं महापालिका शाळांचा दर्जा बदलणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी

  1. कोविड आरोग्य विषयक संसाधनांसाठी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली असून हँड सॅनिटायझर, साबण, हँड वॉश पुरवले जाणार आहेत.
  2. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे "मुंबई पब्लिक स्कूल" अस नामकरण करून नवीन बोधचिन्ह दिला जाणार आहे. जनतेत सकारात्मक दृष्टिकोन व्हावा याकरिता ही योजना आखण्यात आलीय. यात प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल करण्यात आली असून त्याचा वापर सर्वशाळांसाठी करण्यात येणार आहे. 
  3. उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी  करिअर कॉन्सिलींग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे २०२१ पासून `करिअर टेन लॅब´या संस्थेमार्फत नियोजन...ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल यासाठी तब्बल २१.१० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
  4. CBSC बोर्डाच्या २ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या आता मुंबई शहरात २, पश्चिम उपनगरात ३, पूर्व उपनगरात ५ , अशा मिळून १० शाळा ज्युनियर kg ते ६ वी पर्यंत सुरू होतील. त्यासाठी २ कोटींची करण्यात आली आहे.
  5. मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या २७ शालेय वस्तूंसाठी ८८ कोटींची तरतूद
  6. 25 माध्यमिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब- विचारशील प्रयोगशाळा सुरु होणार आहे. यात विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साहित्याची मांडणी करुन प्रयोग करु शकतील. यासाठी ५.३० कोटींची तरतूद
  7. संगीततज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम. जोशी मार्ग महापालिका शाळेत "मॉडेल संगीत केंद्र" उभारणार. यात स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, Wi fi या सेवा पुरवल्या जातील. त्यासाठी तरतूद १० लाख रुपये केली आहे.
  8. महापालिका शाळेतील १३०० वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद २८.५८ कोटी करण्यात आली आहे.
     

---------------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai bmc budget 2021 22 Education Committee know important points in budget Ramesh pawar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com