Mumbai BMC Budget: मुंबईतले रस्ते होणार सुसाट, कोस्टल रोडसाठी कोट्यवधी

Mumbai BMC Budget: मुंबईतले रस्ते होणार सुसाट, कोस्टल रोडसाठी कोट्यवधी

मुंबई: रस्ते दुरुस्ती करताना कॉक्रिटीकरणावर भर देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. आगामी आर्थिक वर्षात 157 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यातील 145 किलोमीटरच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर सार्वजनिक वाहनतळांसाठी विभाग पातळीवर व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

नरीमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या सागरी किनारी मार्गासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर गोरेगाव मुलूंड जोड रस्त्यासाठी 1300 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी महानगर पालिकेने रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 123 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. त्यात 66 किलोमीटरच्या रस्त्यांचे कॉक्रिकीटीकरण आणि 57 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

वाहनतळाच्या नियोजनासाठी वाहनतळ प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. यानुसार जीआयएस मॅपिंग करुन विभागनिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर वाहनतळांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.
 
रस्ते होणार सुशोभीत, पुलांखाली हॉकिस्टेडियम

पदपथवरील अडथळे दूर करुन ते नागरिकांना चालण्यासाठी योग्य बनविण्याबरोबरच त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 160 किलोमीटरचे 149 पदपथ तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 128 वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यात त्यांची रचना, प्रकाशयोजना, विभाजन आकर्षक पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरातील 344 पुलांपैकी 42 पुलांखाली नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. यात काही पुलांखाली हॉकिस्टेडीयम, उदयान आकर्षक पदपथ तयार करण्यात येणार आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai BMC Budget decided 157 km roads will repaired coming financial year

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com