

Mumbai civic politics intensifies as Shiv Sena and BJP leaders deliberate over the mayoral post following a decisive BMC election victory.
esakal
मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे, मात्र आता महापौर पदाच्या निवडीसाठी राजकारण तापले आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या निर्णायक विजयानंतर, महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाकडून महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. ही सोडत पुढील आठवड्यात मंगळवार किंवा बुधवारी निघण्याची शक्यता आहे.