BMC Mayor : यापूर्वी मुंबईमध्ये होऊन गेले आहेत भाजपचे महापौर! कोण होते प्रभाकर पै?

BMC Mayor History : बीएमसीच्या अधिकृत महापौर यादीत डॉ. पै यांचे नाव नमूद आहे.कर्नाटकातील बरकुर येथे जन्मलेले डॉ. पै यांनी समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य केले. नगरसेवक, महापौर, बेस्ट कमिटी अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदे भुषवली.
Dr. Prabhakar Pai, former Mumbai Mayor (1982–83), remembered for his contributions to public health, social service, and civic administration.

Dr. Prabhakar Pai, former Mumbai Mayor (1982–83), remembered for his contributions to public health, social service, and civic administration.

esakal

Updated on

राज्यात महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवले पण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदाच महापौर बसणार असल्याचा दावा मात्र चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे. याआधी भाजपचे निष्ठावान डॉ. प्रभाकर पै हे १९८२ मध्ये महापौर बनले होते, असा दावा केला जात आहे. बीएमसीच्या आतापर्यंच्या महापौरांच्या यादीतही पै यांचे नाव आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा बसणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com