
Mumbai: मुंबईत विविध रस्त्यांची निकृष्ट बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांसह रस्त्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या गुणवत्ता देखरेख संस्थांनाही (क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सी) मुंबई महापालिकेने ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. काँक्रीटच्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.