रुग्णालयांसह मॉलचे पुन्हा होणार फायर ऑडिट? पालिका घेणार निर्णय

रुग्णालयांसह मॉलचे पुन्हा होणार फायर ऑडिट? पालिका घेणार निर्णय

मुंबई: भांडूप येथील ड्रीम्स मॉल आगीनंतर आता पुन्हा रुग्णालये, नर्सिग होम्स आणि मॉलचे फायर ऑडिट करण्याचा निर्णयापर्यंत महानगर पालिका पोहोचली आहे. येत्या मंगळवारी याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून या बैठकीत तसे निर्णय होण्याची शक्‍यता आहे.ऑक्‍टोबर महिन्यात नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर महानगर पालिकेनं मुंबईतील मॉल्ससह रुग्णालये आणि नर्सिग होम्सची तपासणी केली होती. यात 250 रुग्णालये, नर्सिग होम्समध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे आढळले होते. यात 28 महानगर पालिका आणि तीन सरकारी रुग्णालयांचा समावेश होता.

या व्यवस्थापनांना महानगर पालिकेने चार महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत मार्च अखेरी संपणार आहे. 29 मॉलमध्ये अंतर्गत अग्निसुरक्षा नसल्याचे याच काळात झालेल्या तपासणी आढले होते. या मॉल्सना अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य करण्यासाठी दिलेली मुदतही मार्च अखेरीस संपणार आहे. यात आग लागलेल्या ड्रीम्स मॉलचाही समावेश होता.

ड्रीम्स मॉलच्या दुर्घटनेनंतर महानगर पालिका आता पुन्हा या मॉल्स, रुग्णालये आणि नर्सिग होम्सची तपासणी करण्याचा विचार करत आहे. मंगळवारी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यापूर्वी झालेल्या फायर ऑडिट बाबत बैठक घेणार आहे. त्यावेळी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

रुग्णालये नर्सिंग होम्स
खासगी - 987
महानगर पालिका - 62
सरकारी - 7 
मॉल्स - 71 

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai bmc refire audits hospitals nursing homes and malls

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com