
मुंबई पालिकेकडून 15 दिवसांच्या आत विशेष प्रयोगशाळेची करण्यात येणार स्थापना
मुंबई: मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) कोविड चाचणी नमुन्यांवरील जीनोम सिक्वेंसींग (genome sequencing) करण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिका प्रशासनाकडून (BMC) सांगण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयातच यासाठी एक प्रयोगशाळा (Testing Lab) स्थापित केली जात आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री (Machinery), मशिन्स, मटेरियल (Raw Material) आणि मनुष्यबळ (Manpower) पालिकेकडे आहे. 15 दिवसांत या सर्व लागणाऱ्या गोष्टी दाखल होतील. त्यानंतर, जीनोम सिक्वेसिंग कस्तुरबा रुग्णालयात सुरू केले जाईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai BMC to start genome sequencing laboratory at Kasturba hospital for Covid 19 Genetic Codes)
NIV ला पाठवण्याची गरज नाही
जीनोम सिक्वेंसिंग साठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत किंवा आणि इतरत्र प्रयोगशाळेत पालिकेकडून नमुने पाठवले जातात. त्यामुळे, जर कस्तुरबातच जीनोम सिक्वेसिंग केले गेले तर नमुने इतरत्र कुठेही पाठवण्याची गरज भासणार नाही. जेणेकरुन कोणत्याही व्हायरचे योग्य विश्लेषण इथेच करता येईल. आणि त्यातच आपली उपचार पद्धती, प्रक्रिया यात जर काही बदल करायचा असेल किंवा ती वाढवायची असल्यास तसा निर्णय घेता येईल असे ही काकाणी यांनी सांगितले.
छोट्यातली छोटी माहिती मिळणे शक्य
कोविड व्हायरस स्ट्रेनचा मानवावर किती परिणाम होतो हे या जीनोम सिक्वेसिंगमधून कळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. छोट्यातल्या छोट्या माहितीसाठी पुण्याच्या एनआयव्हीवर अवलंबून राहावे लागते. तसं होऊ नये म्हणून इथेच तशाप्रकारची सुविधा केली जात आहे.
15 दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न
जीनोम सिक्वेसिंगसाठी लागणारे मशीन्स येत्या आठ दिवसांत दाखल होतील. तर, पुढच्या आठ दिवसांत त्याचे व्यवस्थापन, मटेरियल्स, टेस्टिंग किट्स आणि मनुष्यबळ तयार केले जाईल. त्यानुसार, येत्या 15 दिवसांत जीनोम सिक्वेसिंग सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहिल. ही मशीन हाताळण्यासाठी कस्तुरबातील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. मॅन्युफ्रॅक्चर कंपनीतील सहकारी यांच्याकडून डॉक्टरांना प्रशिक्षण मिळेल आणि मग ते ती मशीन हाताळतील.
वाढीव मनुष्यबळाची गरज
या कामासाठी वाढीव मनुष्यबळाची गरज लागणार आहे. काही टेक्निशियन्स, सपोर्ट स्टाफ पालिकेला यासाठी घ्यावा लागणार आहे. कस्तुरबातील डॉक्टर्स, आणि इतर स्टाफची या कामासाठी मदत घ्यावी लागेल, दरम्यान, विषाणूवर संशोधन करण्यासाठी पालिका तज्ञांची समिती देखील तयार करणार आहे. ज्याचा फायदा कोविड 19 चे विविध प्रकार आणि त्याचा मानवावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी मदत होईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.