Mumbai: खेळता खेळता हरवली दोन लहान भावंडं.. सायंकाळी कारमध्ये आढळले मृतदेह! गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय

Two missing kids found dead in car: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाचा आणि 5 वर्षांच्या मुलीचा समावेश आहेत.
Two missing kids found dead in car
Two missing kids found dead in carEsakal

Two missing kids found dead in car: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाचा आणि 5 वर्षांच्या मुलीचा समावेश आहेत.

याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. साजिद मोहम्मद शेख (वय वर्षे ७) आणि रीना, (वय वर्षे 5) या दोघा बहीण भावांचा मृत्यू झाला आहे.

Two missing kids found dead in car
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मृत ७ वर्षांचा मुलगा आणि त्याची ५ वर्षांची बहीण अँटॉप हिल परिसरात आपल्या आई-वडिलांसह राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते दोघे खेळण्यासाठी बाहेर पडले. बरात वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. मुलं न सापडल्याने त्यांच्या आई-वडिलांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Two missing kids found dead in car
Nandurbar Crime: बनावट शिक्के, कागदपत्रांच्याआधारे दारूची तस्करी! जळगावच्या एकास अटक; सैन्यात असल्याचे बनावट ओळखपत्रही जप्त

पोलिसांनी तातडीने मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांना एका जुन्या कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळले. मुले कारमध्ये खेळत असताना त्यातच अडकली आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com