लाच म्हणून महागड्या फोनची मागणी; आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

लाच स्वीकारताना मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत प्रभारी पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत खात्याने रंगेहाथ अटक केली आहे.

Bribe Case : लाच म्हणून महागड्या फोनची मागणी; आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

मुंबई - लाच स्वीकारताना मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत प्रभारी पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत खात्याने रंगेहाथ अटक केली आहे. विजय शिवदास माने धारावी पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.आरोपी पोलीस निरीक्षकाने पिडीत तक्रारदाराकडे 1 लाख रुपये किंवा आय फोन अशी लाचेची मागणी केली होती. परंतु अखेर 40 हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपी पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात अटक केली.

आयफोनची मागणी

या प्रकरणी तक्रारदार व त्यांच्या आई विरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदारालाअटक करण्यात आली होती . आरोपी पोलीस अधिकारी विजय माने यांनी तक्रारदारवर दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्याकरता एक लाख रुपये किंवा आयफोन मोबाइल ची लाचेच्या स्वरूपात मागणी केली. परंतु 40 हजारात व्यवहार निश्चित करण्यात आला.

तसेच आरोपी विरोधात तक्रारदारा विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी सुरू केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि कारवाईदरम्यान आरोपी प्रभारी पोलीस निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.