मुंबईतील सायन परिसरात गगनचुंबी इमारतीला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Building Fire

मुंबईत गगनचुंबी इमारतीत आगीच्या घटनेसंदर्भात एकच आठवड्यात ही दुसरी घटना आहे.

Mumbai Fire : मुंबईतील सायन परिसरात गगनचुंबी इमारतीला आग

मुंबई - मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील १९ मजली रहिवाशी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गगनचुंबी इमारतीत आगीच्या घटनेसंदर्भात एकच आठवड्यात ही दुसरी घटना आहे. या पूर्वी मागील आठवड्यात दादर परिसरात गगनचुंबी इमारतीला आग लागली होती.

सायन कोळीवाडा परिसरातील एमए रोडवरील ओम शिवशक्ती हाउसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी 12.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आग कशामुळे लागली? यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसून शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सायन कोळीवाडा परिसरात एमए रोडवर ही इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज दुपारी आग लागली.या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक जंबो वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एम ए रोडवरील ओम शिव शक्ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज दुपारी आग लागली. मात्र, आगीच स्वरूप मोठ्या प्रमाणात न पसरल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे माहिती समोर आली नाही.

एकाच आठवड्यात दुसरी घटना

यापूर्वी दादर पूर्व येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या समोर नव्यानेच बांधण्यात आलेल्या आर ए रेसीडेन्सी या आलिशान गगनचुंबी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर गुरुवारी 26 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. मात्र इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अग्निशमन दलाच्या अग्निमोचक वाहनावरील उच्च दाबाचे अवजड पंप हातात घेऊन अग्निशामक जवानांनी अक्षरशः 42 मजले चढून पार केले. प्रत्येक दहा मजल्यानंतर तिथे पंप जोडून जलवाहिनी वरच्या मजल्यापर्यंत नेली जात होती.

42मजल्यापर्यंत सर्व यंत्रणेसह पोहोचण्यास मध्यरात्रीचा एक वाजला होता. त्यामुळे आगीचा स्तर पाच क्रमांकाचा असल्याचे घोषित करण्यात आले होते. एक वाजल्यानंतर प्रत्यक्ष आग विझवण्याचे काम सुरू झाले व संपूर्ण आग आटोक्यात येण्यास मध्यरात्रीचे साडेतीन वाजले होते. इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे ही आग विझवण्यास वेळ लागला. 42 व्या मजल्यावर ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती. त्या तून आग ती पसरली नाही, त्यामुळे जिवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली नाही.

टॅग्स :fireMumbai