मुंबईत इमारतीच्या इमारती होताहेत कोरोनाबाधित; अवघ्या तीन दिवसात 'इतक्या' इमारती सील

समीर सुर्वे
Tuesday, 8 September 2020

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसात 302 नव्या इमारतींना सिल लागला आहे.

मुंबई: सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसात 302 नव्या इमारतींना सिल लागला आहे.5 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील 7 हजार 99 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहेत. बोरीवलीत सर्वाधिक इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत कोविड रुग्णवाढीचा वेग वाढला आहे.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांचा होता.तो आता 71 दिवसांवर आला आहे.तर,जुन,जुलै महिन्यात वस्त्यांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते.मात्र,ऑगस्टच्या पहिल्या पंधरावड्यानंतर इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागले. सध्या आढळत असलेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे इमारतींमधील असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

महानगर पालिकेने प्रसिध्द केलेल्या आकडेवारी नुसार 2 सप्टेंबर पर्यंत 6 हजार 797 इमारती सिल होत्या. तर,5 सप्टेंबर पर्यंत ही संख्या 7 हजार 99 पर्यंत पोहचली आहे.प्रतिबंधीत वस्त्यांची संख्याही 8 ने वाढली आहे.बोरीवली आर मध्य प्रभागात सर्वाधिक म्हणजे 1348 इमारती कोविडचे ऍक्‍टिव्ह रुग्ण असल्याने सिल करण्यात आल्या आहेत.2 सप्टेंबर रोजी या प्रभागात 1171 इमारतींमध्ये कोविडचे ऍक्‍टीव्ह रुग्ण होते.त्यावेळी सिल केलेल्या इमारतींमध्ये 7 लाख 51 हजार 980 नागरीक राहत होते.तर,आता 7 लाख 90 हजाराच्या आसपास नागरीक सिल केलेल्या इमारतींमध्ये राहात आहेत.

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

5 सप्टेंबर
पहिल्या पाच प्रभागानुसार सिल इमारती
- बोरीवली - 1348
-कांदिवली - 614
-विलेपार्ले अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम -521
- विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्‍वरी पश्‍चिम - 432
-मालाड - 428
-------
पहिल्या पाच प्रभागानुसार प्रतिबंधीत वस्त्या
- कुर्ला - 55
- विक्रोळी,पवई,भांडूप - 51
-विलेपार्ले,अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व - 44
- दहिसर - 43
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai, buildings are being blocked; Seal so many buildings in just three days