Instagramवर महिलेशी मैत्री, व्हिडिओ कॉलवर झाले नग्न; मुंबईतील व्यावसायिकाला धमकावत मागितले लाखो रुपये

Mumbai Crime: मुंबईतील गिरगाव परिसरात ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचे समोर आले आहे.
Mumbai Crime

Mumbai Crime

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील गिरगाव परिसरातून ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकांना सोशल मीडियावर ओळख वाढवण्यासाठी, नवे मित्र-मैत्रीण बनवण्याची सवय असते. मात्र हीच सवय मुंबईतील एका व्यावसायिकाला महागात पडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एका अनोळखी तरुणीसोबत मैत्री केल्यानंतर व्यावसायिकाला थेट सेक्सस्टॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी केल्याचाही प्रकार घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com