मध्य रेल्वे एक पूल पाडणार, तर एक पूल बांधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Carnc Bridge

सीएसएमती आणि भायखळा रेल्वे स्थानका दरम्यानचा कर्नाक उड्डाण पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 19 आणि 20 नोव्हेंबरला, 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे.

Carnc Bridge : मध्य रेल्वे एक पूल पाडणार, तर एक पूल बांधणार

मुंबई - कर्नाक उड्डाणपूला पाडण्यासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. तर कोपरी येथील सुरू होणार्‍या रस्ते उड्डाणपुलासाठी रविवारी-सोमवारी मध्यरात्री मुलुंड आणि ठाणे दरम्यान विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनासाठी शनिवार-रविवार हे दोन दिवस फार महत्वाचे आहे. या दोन दिवसात रेल्वे मार्गावरील एक उड्डाणपूल पडणार तर दुसरा पूलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे.याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दर रविवारी घेण्यात येणार मेगाब्लॉक रद्द असणार आहे.

सीएसएमती आणि भायखळा रेल्वे स्थानका दरम्यानचा कर्नाक उड्डाण पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 19 आणि 20 नोव्हेंबरला, 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक मुख्यमार्गावर 17 तासांचा, हार्बर मार्गावर 21 तासांचा आणि मेल एक्सप्रेस कोचिंग डेपोच्या यार्ड लाईनवर 27 तासांचा असणार आहे. मुख्यमार्गावरील 17 तासांचा हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा दरम्यान राहील. 17 तासांचा हा ब्लॉक शनिवारी रात्री 11 वाजता सुरू होऊन , रविवारी सायंकाळी 4 वाजता संपेल.

याचप्रमाणे, हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान राहील. 21 तासांचा हा ब्लॉक शनिवारी रात्री 11 वाजता सुरू होऊन, रविवारी रात्री 8 वाजता संपेल. म्हणजेच, मुख्यमार्ग आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संपुर्ण वाहतूक ब्लॉक सुरू झाल्यानंतर क्रमशः 17 आणि 21 तासानंतर सुरळीत होईल. उर्वरीत, मेल एक्सप्रेस यार्डलाईनची वाहतूक 27 तासानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या मध्य रात्री 2 वाजता सुरू होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी मुख्यमार्गावर भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकातून ठाणे, कल्याण तसेच कर्जत- कसारा या स्थानका दरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जातील.

या ब्लॉकमुळें 18 मेल एक्स्प्रेसच्या जोड्या रद्द केल्या आहेत, याशिवाय 68 मेल एक्सप्रेस ट्रेन्स या दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक या स्थानकात शॉर्ट ओरिजट आणि शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहे.

कोपरी उड्डाण पूलचे गर्डर टाकणार -

पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाणे आणि मुंबईकरांच्या बहुप्रतीक्षित असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री १. ३० ते ३.४५ यावेळेत मुलुंड आणि ठाणे दरम्यान विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

- एकूण सात गर्डर टाकणार

- प्रत्येक गर्डरचे १०४ टन वजण

- ९० मीटर लांबीचा गर्डर

- प्रत्येक गर्डरची लांबी : ६३ मीटर (रेल्वे भाग),

- दोन क्रेन वापरल्या जातील: ७०० टन आणि ५०० ​​टन क्षमता

- ५२ कुशल कर्मचारी

- ५० अर्ध कुशल कर्मचारी

- १५ ते २० इंजिनियर अधिकारी