Mumbai Crime News
esakal
मुंबई : प्रेमसंबंध तोडल्याने अस्वस्थ झालेल्या तरुणाने रागाच्या भरात प्रेयसीची दिवसाढवळ्या भरवस्तीत चाकूचे (Mumbai Crime) असंख्य वार करीत खून केला. पुढे तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवत आयुष्य संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काळाचौकी येथील ‘आशा मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम’जवळ घडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीने संध्याकाळी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.