सीबीडीतील दरोड्याप्रकरणी सहा आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

कोपरखैरणे- सीबीडी येथील रो हाऊसवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपी सराईत असून, त्यांनी मुंबईतही घरफोडी व वाहनचोरी केल्याचे चौकशीत उघड झाले.

विनोदकुमार वैष्णव, रॉनी लोबो, छोटू उर्फ अझरूद्दीन खान, गणेश सिंग, डमर सिंग आणि हिम्मत सिंग सर्व रा. मूळ नेपाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सीबीडी येथील प्रकाशसिंग गाला यांच्या रो हाऊसवर 6 डिसेंबर रोजी आरोपींनी चाकू व बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. त्यांनी घरातील नोकराला एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यानंतर घरातील दागिने, 72 हजारांची रोकड आणि तीन हजार ऑस्ट्रेलियन डॉलर घेऊन पलायन केले होते.

याप्रकरणी एनआरआय पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. त्यात रो हाऊसमधील माळी गणेश सिंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गाला यांच्या आर्थिक स्थितीबाबत गणेशला पूर्णपणे माहिती होती. त्याने त्याचा भाऊ डमर सिंग व चुलत भाऊ हिंमत सिंगला साथीला घेतले. तर हिंमत सिंगने आणखी तीन साथीदारांना मदतीला घेतले. त्यानंतर हा दरोडा टाकण्यात आला होता.

अटकेतील वैष्णव हा सराईत गुन्हेगार आहे. गणेश सिंगच्या माहितीनुसार वैष्णवने योजना आखून दरोडा टाकला. आरोपींकडून 600 ऑस्ट्रेलियन डॉलर, दुचाकी, देशी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटकेतील आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अशोक फल्ले यांनी दिली.

Web Title: mumbai cbd robbery accused caught