Mumbai local: मुंबईकरांचा थरकाप! पावसात ठप्प लोकल, मध्य रेल्वे ३० मिनिटे लेट; ठाणे-कल्याणमध्ये जीव धोक्यात टाकून प्रवास

Mumbai local train delay : अचानक पावसात मध्य रेल्वेची वाट लागली; डोंबिवलीजवळ डबा रुळावरून घसरल्यानंतर दुरुस्ती न पूर्ण, ठाणे-कल्याण पट्ट्यात लोकल ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने स्टेशनांवर प्रचंड गर्दी व प्रवाशांचा संताप
mumbai local

mumbai local

esakal

Updated on

मुंबई: मध्य रेल्वेच्या वाहतुकीत सलग दुसऱ्या दिवशी मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. अचानक पावसामुळे आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता लोकल गाड्यांच्या उशिराने धावण्याचा फटका बसत आहे. कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकूणच मध्य रेल्वेवरील वाहतूक ३० मिनिटे मागे पडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रागाचा स्फोट झाला असून, स्टेशनांवर तुफान गर्दी उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com