Mumbai News : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा होणार पुर्नविकास; ८५० कोटी रुपयांची तरतूद

एप्रिल महिन्या निविदा प्रसिद्ध होणार
Mumbai Central Railway Station redeveloped 850 crore provision tender Amrit Bharat Station Yojana
Mumbai Central Railway Station redeveloped 850 crore provision tender Amrit Bharat Station Yojanaesakal

मुंबई : रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास करण्याची घोषणा केली आहे. यासाठी यंदाचा अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकासाचा कामासाठी एप्रिल महिन्यात निविदा जाहीर करण्यात येणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या १५ तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकासाची घोषणा करण्यात आली आहेत.

याकरिता यंदाचा अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकासच्या कामाचा आरखडा तयार करण्याचे काम सुरु आहेत. एप्रिल महिन्यात निविदा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहेत.

या १२ स्थानकांचा होणार पुर्नविकास

अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, चर्नी रोड, दादर, ग्रॅन्ट रोड,जोगेश्वरी, लोअर परळ, मालाड, प्रभादेवी, मरीन लाइन्स आणि मुंबई सेंट्रल

असा होणार पुर्नविकास

स्थानकांचा विकास करताना रुफ प्लाझाची सुविधा देणार येणार असून त्यात स्टॉल, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. स्थानकांतील प्रवेशद्वारांची लांबी-रुंदी वाढवणे, स्थानकाच्या दर्शनी भाग, रेल्वेच्या हद्दीतील वर्दळीचा परिसर, प्लॅटफॉर्मवरील छत, ड्रेनेजची सुधारणा करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर नवीन प्रसाधनगृह, स्थानकात अन्य प्रवेशद्वारासाठी नियोजन, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेचा मुंबई विभागातील १२ स्थानकाचा समावेश आहे. आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सध्या पुर्नविकासाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com