
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईत १२ नॉन-एसी लोकल होणार एसी
मुंबई : मध्य रेल्वेने बुधवारी आपल्या मेनलाइनवरील सध्याच्या 12 नॉन-एसी लोकल 14 मेपासून एसी लोकलने बदलण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार रविवारी 14 अतिरिक्त एसी लोकल गाड्या सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी देखील चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Local train Update)
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, मुख्य मार्गावरील एसी लोकलला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि वाढलेली मागणी लक्षात घेऊन, आम्ही सध्याच्या 12 नॉन-एसी लोकल मेनलाइनवरून हार्बर मार्गावरील एसी लोकलने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकल गाड्यांच्या एकेरी प्रवास भाड्यात कपात केल्यानंतर त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा: टाटाची Nexon EV Max लाँच, एका चार्जवर चालते 437 किमी; पाहा किंमत-फीचर्स
CSMT आणि कसारा/खोपोली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मुख्य मार्गासह आणि CSMT आणि गोरेगाव/पनवेल स्थानकांदरम्यान धावणाऱ्या हार्बर मार्गासह मध्य रेल्वे 35 लाखांहून अधिक प्रवाशी चार वेगवेगळ्या कॉरिडॉरमध्ये लोकलने प्रवास करतात.
यासह, मध्य रेल्वेच्या गाड्यांची एकूण संख्या आठवड्यात दिवसांमध्ये 1,810 एवढीच राहील, परंतु रविवार आणि सुट्टीच्या दिवशी त्यांची संख्या 1,460 वरून 1,474 वर जाईल, असे नमूद केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी 5 मे पासून एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत कपात केली. मुख्य मार्गावरील एसी लोकलवरील दैनंदिन प्रवाशांची संख्या एप्रिलमध्ये सरासरी 19,761 वरून 30,724 वर पोहोचली.
हेही वाचा: राज्यात येत्या काही तासांत 'या' भागात पावसाची शक्यता
Web Title: Mumbai Central Railway To Replace 12 Non Ac Locals With Ac Trains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..