मुंबई-चेन्नई एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; रेल्वे सेवा विस्कळीत

रविंद्र खरात 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कल्याण  : मुंबई वरून चेन्नई कडे जाणारी एक्सप्रेस मेल गाडी कल्याणमध्ये आज (सोमवार) तीन वाजून पाच मिनिटाला येताच इंजिन मध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची कल्याण ते मुंबई आणि कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

कल्याण  : मुंबई वरून चेन्नई कडे जाणारी एक्सप्रेस मेल गाडी कल्याणमध्ये आज (सोमवार) तीन वाजून पाच मिनिटाला येताच इंजिन मध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची कल्याण ते मुंबई आणि कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

मध्य रेल्वेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई सीएसटीएम वरून चेन्नईच्या दिशेने एक्सप्रेस मेल गाडी कल्याण रेल्वे स्थानकात  आज (सोमवार)दुपारी 3 वाजून 5 मिनिटाला फलाट चारवर आली.  त्या 'मेल' गाडीच्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ माजली. यामुळे मुंबई वरून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या जलद गती मार्गावर दोन मेल आणि आणि दोन लोकल खोळंबुन राहिल्या. त्यानंतर कल्याण ते कसारा कल्याण ते कर्जत मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम होत अर्धा तास उशिरा लोकल धावत असल्याने प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 4 नंबर फलाट वर इंजिन दुरुस्ती आणि बदल करण्याचा कामाला सुरूवात झाली. 4 वाजून 15 मिनिटाला नवीन इंजिन बसविण्यात आले तर, काम 4 वाजून 26 मिनिटाला पूर्ण होऊन 4 वाजून 33 मिनिटाला मेल गाडी चेन्नईच्या दिशेने रवाना झाली. मात्र 1 तास 28 मिनिट कल्याण रेल्वे स्थानकात मेल गाडी उभी राहिल्याने फलाटवर चांगलीच गर्दी झाली होती.

याबाबत रेल्वे प्रशासनाने कुठलीही घोषणा न केल्याने प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.  रेल्वे अधिकारी वर्गाच्या गलथान कारभार मुळे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य न दिल्यास प्रवाश्याच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल अशी भीती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए .के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ''चेन्नई एक्सप्रेस इंजिन 3 वाजून 5 मिनिटला बिघाड झाला आणि 4 वाजून 33 मिनिटला पुढे ती मेल गाडी रवाना झाली. या काळात दोन मेल आणि टिटवाळा आणि कसारा लोकल जलद मार्गावर खोळंबुन राहिली. 25 ते 30 मिनिट लोकल सेवा उशिरा धावत होत्या. त्यानंतर सेवा सुरळीत झाल्याचे सांगितले.''

नागरिकांना मनस्ताप
कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर लोकल उशीरा धावत असल्याने अनेक प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर येऊन खासगी वाहने , रिक्षा , बसने प्रवास करण्यासाठी आल्याने स्टेशन परिसरात चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास झाला .

Web Title: Mumbai-Chennai Express Engine Failure; Railway service disrupted