
मुंबई : ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने जगभरात शोककळा पसरली आहे. मुंबईतही त्यांच्या निधनामुळे कॅथॉलिक समुदायात दुःखाची लाट पसरली आहे. मुंबईतील सर्वच चर्चमध्ये पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे.