

Martyrs Day
ESakal
नितीन जगताप
मुंबई : २१ नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाचे बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचे आज सर्वत्र स्मरण करण्यात आले. मात्र, फोर्टसारख्या गजबजलेल्या भागातील हुतात्मा स्मारकाकडे, नेतेमंडळी वगळता सामान्य मुंबईकर, विशेषतः तरुणाई फिरकताना दिसली नाही. ज्यांच्या त्यागामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याबद्दल आजच्या पिढीची आस्था कमी होत चालली आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.