मेट्रो 3 भुयारी प्रकल्पाच्या कामाला गती; ग्रँट रोड मेट्रो स्थानकाचे काम सुरू

मेट्रो 3 भुयारी प्रकल्पाच्या कामाला गती; ग्रँट रोड मेट्रो स्थानकाचे काम सुरू

मुंबई  : कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्प 3 च्या कामाचा वेग वाढला आहे. नुकताच मेट्रो -3 मार्गावरील दक्षिणेकडील आठवे स्थानक असलेले ग्रँट  रोड स्थानकाचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत या स्थानकाचे  काम २२% पूर्ण झाले आहे. या स्थानकामुळे पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड उपनगरीय रेल्वे स्थानकाला थेट जोडले जाणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे. 

ग्रँट रोड हे स्थानक कट आणि कव्हर आणि नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एन. ए. टी. एम.) तंत्रज्ञानाद्वारे बांधले जाणार आहे. ग्रँट रोड स्थानक 202 मीटर लांबीचे, 17 मीटर रुंद आणि भूपातळी पासून सुमारे 27 मीटर खोलवर आहे. सध्या ग्रँट रोड मेट्रो स्थानकाचे सिकेन्ट पाईलिंग पूर्ण झाले. आता, खोदकामास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जलवाहिन्या, गटार वाहिन्या आणि बेस्ट विद्युत केबल्ससारख्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या वाहिन्यांना आधार देण्याचे काम सुरू आहे. स्थानकाच्या खोदकामासोबतच स्थानकानजीकच्या इमारतींना आधार देण्यासाठी स्ट्रॅटस आणि वॉलर्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय स्थानकाच्या बेस स्लॅबचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. ग्रँट रोड मेट्रो स्टेशनमध्ये ४० टन क्षमतेची एक क्रेन आणि एक जेसीबी सोबत एक हायड्रा, एक टेंशन पाइल मशीन, एक इलेक्ट्रिक कंप्रेसर, 40 टन क्षमतेची दोन गॅन्ट्री क्रेन आहेत. ग्रँट रोड स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण 191 अधिकारी, कर्मचारी व कामगाराची फौज तैनात करण्यात आली आहे. 

मेट्रो प्रकल्प 3 चे आतापर्यंत एकूण 93 % भुयारीकरण व 64 % बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, सर्व स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. 

ग्रँट रोड मेट्रो स्थानकामुळे पचिम रेल्वेचे ग्रँट रोड स्थानक, बाबुलनाथ मंदिर, रिलायन्स रुग्णालय, ऑगस्ट क्रांती मैदान, कमला नेहरू पार्क, मणीभवन, भारतीय विद्या भवन यांना महत्वाच्या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai city marathi news Speeding work Metro 3 subway project train latest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com