BMC ने केला "ण' चा "न'; 'मुरुम खाण' ऐवजी 'मरुम खान' असा दर्शवला फलक

BMC ने केला "ण' चा "न'; 'मुरुम खाण' ऐवजी 'मरुम खान' असा दर्शवला फलक

मुंबई :मराठी भाषेत "ध'चा "मा'झाल्यामुळे होत्याचे नव्हते होते हा दाखल अनेक शतका पासून दिला जातो.तर,दुसऱ्या बाजूला "ण'चा "न'झाल्यावर काय होते हे महानगर पालिकेने दाखवून दिले आहे. मालाड येथे मुरुम खाण अशा फलका ऐवजी मरुम खान असा फलक महानगर पालिकेने लावला आहे. 

मालाड मालवणी येथी चर्च जवळील एका रस्त्याचे "मरुम खान'असा नामफलक महानगर पालिकेने लावला आहे.मात्र,याभागात पुर्वी मुरुमाच्या खाणी होत्या.त्यामुळे या भागाला मुरुम खाण म्हणून ओळखले जाते.असे स्थानिक रहिवाशांनी लक्षात आणून दिले असल्याचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी भुषण वाडे यांनी सांगितले.याबाबत गेल्या दोन वर्षांपासून ते पालिकेच्या पी उत्तर प्रभागा कार्यालयासोबत पाठपुरावा करत आहे.लेखी,शाब्दीक विनंती करण्यात आली.मात्र,प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असा दावाही त्यांनी केला. 

मराठी भाषा दिनाच्या पुर्व संध्येला 26 फेब्रुवारी रोजी वाडे यांनी पुन्हा प्रभाग कार्यालयाला पत्र दिले आहे.तसेच,याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

mumbai city marathi news wrong board published by bmc on murum khan live lates update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com