मुंबईत पसरलेल्या धूर, धुके आणि धुरक्यामुळे मुंबईकरांच्या फुप्फुसांवर परिणाम

मुंबईत पसरलेल्या धूर, धुके आणि धुरक्यामुळे मुंबईकरांच्या फुप्फुसांवर परिणाम

मुंबई: मुंबईसह लगतच्या शहरात पसरलेल्या धूर, धुके आणि धुरक्याचा परिणाम मुंबईकरांच्या फुप्फुसांवर होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे, मुंबईकरांची श्वसनयंत्रणा धोक्यात आली असून लॉकडाऊननंतर वाहन खरेदी संख्येत झालेली वाढ या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे ही सांगण्यात आले आहे. 

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शुन्यावर आलेले हवेतील प्रदूषण ऑक्टोबर नंतर कैक पटीने वाढले असून बुधवारी सफर संस्थेकडून वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी , बोरिवली आणि नवी मुंबई ही चार ठिकाणे प्रदूषित नोंदवण्यात आली. येत्या काही दिवसात यामध्ये वाढ होण्याचे संकेत दिले आहे. मुंबईलगतच्या भागातून म्हणजेच रायगड, पालघर,  नवी मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली इथून लॉकडाऊन संपल्यानंतर  नागरिकांनी रेल्वे (लोकल ) वाहतूक सर्वांसाठी खुली नसल्यामुळे अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर सुरु केला. याचा परिणाम म्हणून महामार्गावर भयंकर वाहतूक कोंडी होऊन हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. 

घरांपासून कामाच्या ठिकाणांचे अंतर वाढलेले असल्यामुळे गरज म्हणून वाहन संख्या वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात किफायतशीर साधन म्हणून डिझेलच्या वाहनांना मोठी मागणी आहे. सियामच्या आकडेवारीनुसार,  गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये 2 लाख 85, 367 गाड्यांची विक्री झाली असून गेल्यावर्षी 2 लाख 53 हजार 139 गाड्यांची विक्री झाली होती. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
नेरुळ नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचे छाती रोग आणि फुप्फुसरोगतज्ञ डॉ अभय उप्पे यांनी सांगितले की, मुंबईत आणि लगतच्या शहरांमध्ये अनेक औद्योगिक वसाहती ( एमआयडीसी )असल्यामुळे इथून निर्माण होणारे  कोळसा ज्वलन,  विविध प्रकारच्या वायू जलनामुळे वायू प्रदूषण होत असते. त्याचसोबत गेल्या तीन महिन्यात डिझेल- पेट्रोल गाडीच्या अति वापरामुळे, डिसेंबर महिन्यात थंडीमुळे आलेले धुके याचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसून येत आहे.

हे आजार बळावतात

गाड्यांतून निघालेल्या धुरामुळे कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढीस लागले आहे.  नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य आहे. धुळीमुळे सीओपीडी, आयएलडी आणि दमा असे श्वसन विकार बळावत आहेत. सीओपीडी हा विकार वयाबरोबर वाढत जातो. फुफुसातील पेशी खराब होतात कारण, फुप्फुसाचं काम असतं ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणं असते. मात्र वायू प्रदूषणामुळे ही प्रक्रिया कुठेतरी बाधित होते. वायू प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)

Mumbai climate Smoke fog affect the lungs city people

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com