esakal | Mumbai Train: कपडा व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला, अर्थचक्र कोलमडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

Mumbai Train: कपडा व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला, अर्थचक्र कोलमडले!

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : लोकल प्रवास बंद (Local Train) असल्याने अनेक व्यापार ठप्प झाले आहेत. लाॅकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना (Traders) व्यापार करण्यास अनेक निर्बंध आले आहेत. लहान-मोठ्या व्यापाऱ्याचे अर्थचक्र धीम्या गतीने सुरू आहे. कल्याण, उल्हासनगर (Ulhasnagar) येथील भागातील व्यापारी कपड्यांची सामग्री मुंबईत आणण्यासाठी आणि पाठविण्यासाठी लोकलचा वापर करत असत. तर, मुंबईतील होलसेल दुकानातून (Wholesale Shop) ब्युटी पार्लर, सलून, कटलरी दुकानातील सौंदर्य प्रसाधनाची साधने मोठ्याप्रमाणात आणली जात होती. मात्र, लोकलचे दरवाजे बंद असल्याने व्यावसायिक, व्यापारी यांचे नुकसान होत आहे. ( Mumbai Clothes traders facing Financial issues due to Mumbai train issue-nss91)

मुंबईतील क्राॅफर्ड, मनिष बाजारातून खरेदी करून येथील सामग्री कल्याण पलिकडील भागात विक्री केली जाते. तर, उल्हासनगर, कल्याण येथील सामग्री मुंबईत आणली जाते. स्वस्त प्रवासी खर्च, वेळेत आणि वेगवान सामग्रीची वाहतूक होण्यासाठी व्यापाऱ्यांकडून लोकलला प्राधान्य दिले जाते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नसल्याने सामग्रीची वाहतूक होणे बंद झाले आहे. पर्यायाने वाहतूकीने सामग्रीची कमी-जास्त प्रमाणात वाहतूक होत आहे. परिणामी, बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात सामग्री दिसून येत आहे. खरेदी-विक्री कमी प्रमाणात होत असल्याने आर्थिक चक्र धीम्या गतीने सुरू आहे. लोकल प्रवासास अनुमती मिळाल्यास व्यापार पुन्हा सुरळीत होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: मुजोर शिक्षण संस्थांविरोधात 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना' हायकोर्टात

लग्न सराईचा काळ मे-जूनपर्यंत असायचा. मात्र, कोरोनाचे नियम आणि लाॅकडाऊनमुळे अनेकांची लग्न समारंभ जुलै, ऑगस्टच्या तारखेत ठेवली आहेत. लग्नाची खरेदी करण्यासाठी, बस्ता बांधण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. मात्र, दुकानात गेल्यावर कपड्यांचा तुटवडा जाणवून येत आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे पेहरावाचे कपडे मुंबईतून मागविली जातात. मात्र, लोकल बंद असल्याने ही पेहराव ग्राहकांना कमीतकमी एका आठवड्याच्या कालावधीनंतर मिळते. ग्राहकांना वेळेत सामग्री न मिळाल्याने अनेक ग्राहक नाराज होऊन जातात. जे साहित्य आहे, त्यावर भागवून घेतात. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करावे लागत आहे, असे कपडे विक्रेता प्रकाश कनोजिया याने सांगितले.

कोरोनापूर्वी मुंबईतील होलसेल बाजारातून कटलेरीची सामग्री घेऊन येत असायची. मात्र, कोरोना काळात लोकल बंद झाल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाला. दरम्यान महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाली होती. त्यावेळी पुन्हा सामग्री आणण्यास मुंबईत गेली होती. मात्र, आता मागील तीन महिन्यांपासून लोकल बंद असल्याने आणि लाॅकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे, त्यामुळे आता लोकल प्रवास खुला करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांचे ठप्प झालेले व्यवसाय पुन्हा सुरू होतील, असे कटलेरी व्यावसायिक मनिषा थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा: महापालिका रुग्णालयाच्या प्राणवायू प्रकल्पात ३२० कोटींचा घोटाळा ? - अस्लम शेख

कोरोना पूर्वी जास्त प्रमाणात कपड्यांचा पुरवठा ट्रक, टेम्पोने होत होता. मात्र, कमी प्रमाणातील कपड्यांचा पुरवठ्यासाठी लोकलचाच वापर केला जात होता. लोकलमुळे प्रवासी खर्चात बचत होत होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून लोकल बंद झाल्याने पर्यायी वाहनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवासी खर्चात वाढ झाली आहे, असे कपडे व्यापारी हरिश भदोरिया यांनी सांगितले.

loading image